सांगलीतील वाचनालयाला पाच हजार पुस्तके

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

सांगलीतील वाचनालयाला पाच हजार पुस्तके
नागपूर : सांगली येथील नगर वाचनालयाचे पुरामुळे नुकसान झाले. या वाचनालयाला मराठी प्रकाशक परिषदेतर्फे 5 हजार 100 पुस्तके राज्यातून संकलित करून भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या भागातील नुकसान झालेल्या ग्रंथालयांसाठी आर्थिक मदत म्हणून 1 लाख रुपये देण्यात येणार आहेत, अशी माहिती सचिन साहित्य प्रकाशनचे सचिन उपाध्याय यांनी दिली.

विशेष म्हणजे, सांगली येथील नगर वाचनालयाचे हे शतक महोत्सवी वर्ष चालू आहे. आलेल्या पुरामुळे वाचनालयातील सर्व पुस्तके पाण्यात बुडाली. यातील काही पुस्तके खराब झाली आहेत. सामाजिक बांधीलकी म्हणून मराठी प्रकाशक परिषदेकडून राज्यातून पुस्तके संकलित करण्यात येत आहेत. यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून अरविंद पाटकर (मनोविकास प्रकाशन), सदस्य सुनीताराजे पवार (संस्कृती प्रकाशन), संजय काकडे (अमोल प्रकाशन), सु. वा. जोशी (उत्कर्ष प्रकाशन) यांची निवड करण्यात आली आहे.
परिषदेच्या राज्यातील सर्व सदस्यांसह प्रकाशक, पुस्तक विक्रेते, लेखक, पुस्तकप्रेमी यांना पुस्तके आणून देण्यासाठी समितीने आवाहन केले आहे. 31 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रभर पुस्तक संकलन मोहीम राबविण्यात येणार आहे. संकलित झालेली आणि आम्हा प्रकाशकांतर्फे गोळा केलेली एकूण 5 हजार 100 पुस्तके वाचनालयाला दिली जातील. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रकाशक परिषद समक्ष सांगलीला जाऊन वाचनालयाला पुस्तके देणार आहेत, अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी यांनी दिली.
पुस्तक संकलनाचे ठिकाण
सचिन साहित्य, सीताबर्डी, नागपूर
मॅजेस्टिक बुक स्टॉल, शिवाजी मंदिर, दादर (मुंबई)
कैलास पब्लिकेशन, गुलमंडी, औरंगाबाद
उत्कर्ष बुक सर्व्हिस, डेक्कन जीमखाना, पुणे
पद्मगंधा प्रकाशन, एरंडवणे, पुणे
श्रीविद्या प्रकाशन, शनिवार पेठ, पुणे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five thousand books to the library in Sangli