MMP Factory Blast : पाच तरुणांचा मोडला अर्ध्यावरती डाव
Explosion Tragedy : एमएमपी कंपनीतील स्फोटात पाच तरुण कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर सहा युवक गंभीर जखमी झाले आहेत. मृत युवकांच्या कुटुंबांचे स्वप्न आणि आशा एका धक्क्याने कोसळल्या आहेत.
उमरेड : एमआयडीसीतील एमएमपी कंपनीतील स्फोटात पाच तरुण कामगारांचा मृत्यू तर सहा युवक गंभीर जखमी झाले. यासोबतच मृत युवकांच्या कुटुंबांची स्वप्नं, अपेक्षा आणि आधारवडही कोसळला आहे.