
भंडारा : जिल्ह्यात सुरू असलेला पाऊस आणि इतर धरणातून सुरू असलेला विसर्ग यामुळे पाणीपातळीत वाढ झाल्याने गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आज त्यात प्रमाणात वाढ केल्यामुळे पवनी व लाखांदूर तालुक्यांत वैनगंगा फुगली आहे. तसेच भंडारा येथे वैनगंगेची धोका पातळी गाठण्याची शक्यता निर्माण झाली असून, अनेक मार्गांवरील वाहतूक बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे.