नदी ओलांडण्याची जीवघेणी बेफिकिरी

पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष अन् यंत्रणेची तारांबळ
Flooding of Purna river flowing under ghat in Buldana district
Flooding of Purna river flowing under ghat in Buldana district

बुलडाणा - जिल्ह्यातील घाटाखाली वाहणार्‍या पूर्णा नदीला पूर आला आहे. यामुळे जिल्ह्यातील जळगाव जामोद ते नांदुरा रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक २४ तासापेक्षाही जास्त काळापासून ठप्प झाली आहे. परंतु, या नदीवर आलेल्या पुलावरील पाण्यातूनही काही चालक अतिउत्साहीपणा करत वाहने टाकत असल्यामुळे अनर्थ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, त्यांना मज्जाव करण्यासाठी जळगाव जामोद किंवा नांदुरा पोलिस स्टेशनचा एकही कर्मचारी नदीकाठावर नसल्याचे चित्र असल्यामुळे ही प्रशासनासह संबंधित चालकांची बेफिकरी इतर यंत्रणांची तारांबळ उडविण्यास कारणीभूत ठरू शकते.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम असून, मुख्यत्व विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम जिल्ह्यासह बुलडाणा जिल्ह्यात संततधार कामय असल्याचे चित्र आहे. यामुळे बहुतांश नदी-नाले ओसडूंन वाहत आहे. यातच अमरावती, अकोला जिल्ह्यासह बुलडाणा जिल्ह्यातून वाहणार्‍या नदी- नाले वाहत आहे. गेल्या १२ तासापासून पाऊस बंद असला तरी, बहुतांश प्रकल्पातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे जलाशयामधील पाणीसाठा नदीपात्रात सोडल्यामुळे पूर परिथस्थती कायम आहे.

जळगाव जामोद ते नांदुरा हा रस्ता ११ ऑगस्टला बंद पडल्यामुळे वाहतूक विस्कळित होऊन बंद पडली. दरम्यान, १२ ऑगस्टला पुलावरील पाणी काही प्रमाणात कमी झाल्यामुळे यातून एका ट्रक चालकाने ट्रक टाकला. अवजड वाहन असल्यामुळे ते नांदुर्‍याच्या दिशेकडून जळगाव जामोदच्या दिशेने खरे परंतु, यामध्ये मोठ्याप्रमाणात धोका होता. यापूर्वी पूरामुळे नदीवरील इंग्रजकालिन पूल खंडित देखील झाला होता आणि पाण्यामुळे पुलाची स्थिती लक्षात येणे कठीण असताना हा जीवघेणा निर्णय चुकीचा असल्याची चर्चा सोशल मिडीयाच्या माध्यमातून होत आहे. यासंदर्भात व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असला तरी, ट्रक किंवा काठावर असलेल्या र्स्टटबाज यांना रोखण्यासाठी नांदुरा व जळगाव जामोद पोलिस कर्मचारी किंवा वाहतूक धोकादायक असल्याबाबत बेरिकेट्स लावण्याची तसदीसुद्धा घेण्यात आली नाही.

यापूर्वी सदर नदीवरून वाहने पडले असून त्यात जीवितहानी झाली आहे. सध्या अनेक नद्यांवरील पुलावर पाणी असताना जीवघेणी वाहतूक करताना वाहने नदीपात्रात वाहून यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाले असून, यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित पोलिस विभागाला सूचितही केलेले असताना याकडे मात्र बेफिकरी करण्यात येत असल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

स्टटबाजांना आवर घालण्याची गरज

पूर्णा नदीला पूर आल्यानंतर स्टटबाज रस्त्यावर उतरून जीवघेणे कर्तब दाखवत असतात. शेगाव ते वरवट बकाल मार्गावरही पूर्णा नदीच्या जुन्या पुलावर दुचाकीस्वार स्टंट करत असल्याचा व्हीडीओ व्हायरल झाला असून, सदर पूल वाहतुकीसाठी बंद असतानाही त्यावरून जात सेल्फी घेण्याचा प्रकार समोर आला.

नांदुरा पोलिस नियुक्तीबाबत कोडे

पूर्णा नदीच्या पुलावरुन पाणी असताना, नांदुर्‍याच्या दिशेकडून जळगाव जामोदकडे पाण्यातून धोका पत्करत चालकाने ट्रक टाकला. यावेळी पोलिस कर्मचार्‍यांची उपस्थिती होती किंवा नाही याबाबत पीआय भूषण गांवडे यांना संपर्क केला असता, त्यांच्यासोबत संपर्क झाला नाही.

पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर दोन कर्मचार्‍यांची नियुक्ती तेथे असते. सध्यास्थिती वाहतूक पूर्णपणे बंद आहे. कुणीही धोका होईल असे कृत्य करू नये.

- सुनील अंबुलकर, पीआय, जळगाव जामोद.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com