वर्धा : मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मी पूजन उत्सवानिमित्त बाजारपेठेत फुले, फळे आणि पूजेच्या साहित्यांनी बाजारपेठ सजलेली दिसून आली..मार्गशीर्ष व्रताच्या आगमनामुळे फुलांचे भाव चांगलेच कडाडले आहेत. गुरुवारी (ता.पाच) पहिले महालक्ष्मी पूजन असल्यामुळे बुधवारी बाजारातील फुल बाजारात सकाळपासूनच महिलांची खरेदीसाठी गर्दी होती. आधीच जीवनाश्यक वस्तू महाग असताना आता सणासुदीच्या दिवसात भाजी आणि फुल बाजारावरही त्याचा परिणाम झाला आहे. शेवटच्या गुरुवारी फुले दुपटीने महाग होण्याची शक्यताही व्यावसायिकांनी वर्तविली आहे..फुलांचा बाजार विविध आकर्षक फुलांसोबत लोकांच्या गर्दीन फुलला आहे. महालक्ष्मी व्रतानिमित्ताने फुलांचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात असल्यामुळे बाजारात फुलांना चांगलीच मागणी वाढली आहे. महालक्ष्मीसाठी हाराचा सेट १५० रुपयांना मिळत आहे. मोठ्या प्रमाणात मागणी असलेली शेवंतीची फुले यंदा बाजारात कमी आली आहेत. त्यामुळे दरवर्षीपेक्षा भावसुद्धा दुप्पट झाले आहेत..पांढरी शेवंती २०० रुपये किलोमहालक्ष्मीच्या हारासाठी शेवंतीच्या फुलांचा उपयोग अधिक होतो. त्यामुळे या फुलांना जास्त मागणी आहे. या वर्षी पांढरी शेवंती बाजारात कमी आल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. पांढरी शेवंती २०० रुपये किलो, पिवळा झेंडू २५०, गुलाब ४००, निशिगंध ४४० रुपये किलोप्रमाणे विक्री केला जात आहे. गुलाब, अष्टर व गुलछडीचीही आवक जेमतेमच आहे. अष्टर, जरबेरा या फुलांची अनुक्रमे १०० ते १५० व २०० ते २५० रुपये किलोप्रमाणे विक्री सुरू आहे..मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार असल्याने फुले, फळे तसेच पूजेचे साहित्य खरेदीसाठी गर्दी पहायला मिळाली. यंदाच्या वर्षी फुलांच्या भावात वाढ झाली आहे.-विवेक कविठकर, फूल व्यावसायिक..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.