‘फूट पॅट्रोलिंग’, नागरिकांशी संवाद

- अनिल कांबळे
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

नागपूर - मानकापूर पोलिस ठाण्याच्या परिसरात केंद्र शासनाच्या संबंधित अनेक शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे ‘हायर क्‍लास’ सेक्‍टरमध्ये मानकापूर ठाण्याला गणल्या जाते. या ठाण्याच्या हद्दीत काही प्रमाणात झोपडपट्टीचाही भाग येत असल्यामुळे पोलिसांनी गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘फूट पॅट्रोलिंग’वर भर दिला.  पोलिस ठाण्यात वेगवेगळी पथके तयार करण्यात आली असून, रात्री आणि पहाटेच्या सुमारास पायी गस्त घालत असल्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणे शक्‍य होत आहे. पायी गस्त घालताना महिला, विद्यार्थी, विद्यार्थिनी, धंदेवाईक तसेच हातठेलेवाल्यांशी पोलिस सहज संवाद साधतात.

नागपूर - मानकापूर पोलिस ठाण्याच्या परिसरात केंद्र शासनाच्या संबंधित अनेक शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे ‘हायर क्‍लास’ सेक्‍टरमध्ये मानकापूर ठाण्याला गणल्या जाते. या ठाण्याच्या हद्दीत काही प्रमाणात झोपडपट्टीचाही भाग येत असल्यामुळे पोलिसांनी गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘फूट पॅट्रोलिंग’वर भर दिला.  पोलिस ठाण्यात वेगवेगळी पथके तयार करण्यात आली असून, रात्री आणि पहाटेच्या सुमारास पायी गस्त घालत असल्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणे शक्‍य होत आहे. पायी गस्त घालताना महिला, विद्यार्थी, विद्यार्थिनी, धंदेवाईक तसेच हातठेलेवाल्यांशी पोलिस सहज संवाद साधतात. त्यांच्या अडीअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करतात. कायदा व सुरक्षा व्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस सामान्यांची मदत घेतात. त्यामुळे किरकोळ वाद सोडून मोठ्या स्वरूपातील गुन्हे जवळपास नाहीत. 

पोलिस स्टेशन - दोन बिट 
मानकापूर पोलिस ठाण्याची स्थापना १ ऑगस्ट २०१५ ला झाली. पुंडलिक भटकर हे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. येथे १०२ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी आहेत. यामध्ये ३ सहनिरीक्षक तर ९ उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मानकापूर आणि झिंगाबाई टाकळी अशी दोन बिट आहेत. 

पोलिसांसमोरील समस्या
पोलिस तलावावर नेहमी प्रेमीयुगुलांचा त्रास आहे. काही शाळकरी विद्यार्थिनीसुद्धा दप्तर घेऊन प्रियकरांसोबत बसलेल्या असतात. काही झोपडपट्टी परिसर असल्यामुळे घरफोडीचे प्रमाण खूप आहे. घरगुती वाद सोडवताना पोलिसांच्या नाकीनऊ येतात. काही मजूर वर्गाची वस्ती असल्यामुळे लूटमारीच्या घटना नेहमी घडतात. मात्र बिट सिस्टिममुळे त्यावर नियंत्रण मिळत आहे.

मानकापूर बिट
प्रभारी मिथिलेश त्रिपाठी (पोलिस उपनिरीक्षक)
मो.९९२३४६५०४५
एकूण कर्मचारी - १४
लोकसंख्या - ८०,०००
गुन्हेगार - ४० 

बिटच्या सीमा
पोलिस तलाव ते पागलखाना चौक, इटारसी पुलिया ते दुसरा ब्रिज, फरस चौक ते मानकापूर रेल्वे क्रॉसिंग ते शफीनगर झोपडपट्टी.

महत्त्वाची ठिकाणे
शफीनगर झोपडपट्‌टी, गोदावरी चौक, ताजनगर, उत्थाननगर, एनएडीटी, मानकापूर क्रीडासंकुल, पासपोर्ट ऑफिस, सीआयडी ऑफिस, गोरेवाडा वॉटर फिल्टर प्लांट, फायर कॉलेज आणि पागलखाना.

झिंगाबाई टाकळी बिट
प्रभारी - गजेंद्र राऊत, सहायक पोलिस निरीक्षक
मो. ८९७५०७६१००
कर्मचारी - १२, 
गुन्हेगार - ५०
लोकसंख्या - एक लाख २५ हजार

बिटच्या सीमा
फरस चौक ते झेंडा चौक, झिंगाबाई टाकळी ते गोधनी रेल्वे क्रॉसिंग, कलेक्‍टर कॉलनी ते गोरेवाडा नई वस्ती.

प्रमुख ठिकाणे
गोधनी परिसर, एमबी टाउन फेज, १, २, ३, झिंगाबाई टाकळी, कोलते ले-आउट, कलेक्‍टर कॉलनी, अन्नाबाबानगर, डोये ले-आउट, गोधनी रेल्वे स्टेशन, बंधूनगर, जयदुर्गा सोसायटी, साईनगर, रुक्‍मिणणीनगर, गीतानगर, बाबा फरीदनगर.

पॅट्रोलिंग केवळ वाहनात बसून केल्यापेक्षा थेट संवाद साधण्यावर पोलिसांचा भर असतो. त्यामुळे सामान्य नागरिक आणि पोलिसांत वेगळे नाते तयार होते. सामान्यांच्या मनात पोलिसांविषयी विश्‍वास निर्माण होतो. बिट सिस्टिम अमलात आणल्यानंतर अनेक गुन्हे कमी झाले. बिट अधिकारी ठाण्याऐवजी चौकीत हजेरी लावत असल्यामुळे नागरिकांच्या नजरेत ते नेहमी असतात. त्यामुळे पोलिसिंग करताना सोपे जाते.
- पुंडलिक भटकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मानकापूर पोलिस स्टेशन

Web Title: foot patroling, public communication