
गडचिरोली : घरकुल बांधकामासाठी जंगल परिसरातून माती वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून कारवाई टाळण्यासाठी तब्बल ८३ हजार रुपयांची लाच घेताना एफडीसीएमच्या एका वनपालाला गडचिरोलीच्या अँटी करप्शन ब्युरोने रंगेहात पकडले आहे. ही कारवाई प्राणहिता वन प्रकल्प विभाग, आलापल्ली अंतर्गत येत असलेल्या आलापल्ली वनपरिक्षेत्र कार्यालयात ८ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास झाली.मारोती गायकवाड असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव असून तो वनपाल या पदावर कार्यरत आहे.