माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांचे संकेतस्थळ हॅक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 सप्टेंबर 2019

अमरावती : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे यांचे संकेतस्थळ हॅक केल्याचा प्रकार मंगळवारी (ता. 3) दुपारी उघडकीस आला.

अमरावती : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे यांचे संकेतस्थळ हॅक केल्याचा प्रकार मंगळवारी (ता. 3) दुपारी उघडकीस आला.
प्रवीण पोटे राज्यमंत्री असताना त्यांनी "प्रवीण पोटे पाटील डॉट इन' असे संकेतस्थळ सुरू केले होते. त्यावर ते विविध उपक्रमांची माहिती अपलोड करीत होते. हे संकेतस्थळ अज्ञात व्यक्तीने हॅक केले. स्टेट मिनिस्टर प्रवीण पोटे पाटील (भारतीय जनता पार्टी) हॅक्‌ड बाय मुहम्मद बिलाल, टीम पीसीई, पाकिस्तान जिंदाबाद, फ्री कश्‍मीर, फ्रीडम इज अवर गोल' यासह जम्मू-कश्‍मीरचा उल्लेख संकेतस्थळावर करण्यात आला आहे. याप्रकरणी पोटे यांच्यातर्फे अमोल काळे यांनी रात्री 9.45 वाजता पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Minister of State Praveen Pote's website hacked