हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात; दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाला झालेल्या भीषण अपघातात दोघे जागीच ठार झाले, तर तिघे गंभीर आहेत.

नागपूर: माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाला झालेल्या भीषण अपघातात दोघे जागीच ठार झाले, तर तिघे गंभीर आहेत. हंसराज अहिर सुखरूप आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सीआरपीएफ जवानासह दोघांचा समावेश आहे.

वर्धा जिल्ह्यातील कांडळीजवळ आज (गुरुवार) सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला. हंसराज अहिर हे चंद्रपूरहून नागपूरला जात होते. वर्ध्यातील जाम चौरस्त्याजवळ कांडळी नदी पार केल्यानंतर हा अपघात झाला. सुरक्षा वाहनाचा चालक गंभीर असल्याचे समजते. हा अपघात इतका भीषण होता की, ताफ्यातील अपघातग्रस्त गाडीचा चेंदामेंदा झाला आहे.

अपघातात विनोद झाडे (पोलिस) आणि फलजीभाई पटेल (सीआरपीएफ) जवान या दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तीन जवान गंभीर जखमी झाले असून, त्यांना नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: former union home minister hansraj ahirs crpf vehicle accident two dead