हिंदूबांधवानी खोदला मस्जिदचा पाया

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 December 2019

न्यायालयात अयोध्याचा लागलेला निकाल व नागरिकत्व विधेयका वरून देशातील सध्या वातावरण पाहता अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात मात्र हिंदु व मुस्लीम समुदायाने सामाजिक संदेश दिला आहे. तळेगाव बाजार येथे मस्जिद बांधकामा पायाभरणी हिंदू बांधवाचे हातून करण्यात आल्याची प्रेरणादायी उपक्रम पार पडला.

तळेगाव बाजार (जिल्हा अकोला) :  न्यायालयात अयोध्याचा लागलेला निकाल व नागरिकत्व विधेयका वरून देशातील सध्या वातावरण पाहता अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात मात्र हिंदु व मुस्लीम समुदायाने सामाजिक संदेश दिला आहे. तळेगाव बाजार येथे मस्जिद बांधकामा पायाभरणी हिंदू बांधवाचे हातून करण्यात आल्याची प्रेरणादायी उपक्रम पार पडला.

तळेगाव बाजार येथे हिंदू-मुस्लिम गुण्यागोविंदाने राहतात. बाहेरच्या घटनाचा परिणाम गावात होऊ देत नाहीत. गावात महादेवाचे जागृत देवस्थान आहे. यात्रेच्या वेळी रथ निघतो. पंरतु गावकऱ्यांनी हा रथ मुस्लिम वस्तीमधुन न काढता हिंदू वस्तीमधुनच काढतात. तर मुस्लिम समाज बांधव सुध्दा एकोप्याने आपल्या धर्माचे पालन करतात. अशा गावात नुकताच नवीन मस्जिद बांधण्याचा संकल्प मुस्लीम बांधवानी घेतला. गावाची सामाजिक बांधिलकी जोपासत मुस्लिम समाजाच्या लोकांनी नवीन मस्जिद बांधकामांचे भूमिपूजन माजी पोलीस पाटील भाऊसाहेब खारोडे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी मुस्लिम समाजाचे अजिम मौलाना, अब्दुल जब्बार, खुदुशभाई, रावसाहेब खारोडे, अशोक मानखैर, सदानंद खारोडे, उध्दव मानखैर, दिलिप खारोडे, दिनेश खारोडे यांची प्रमुख  उपस्थिती होती. यावेळी बब्बुशाह हैदर शाह, रशिदशा उस्मान पटेल, नजाकत शाह सत्तारशा, सलामत शाह, शे.मुजफ्फर, विलास हिवराळे यांचेसह गावातील हिंदू मुस्लिम मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: foundation of the mosque was dug by Hindu