Bhandara Accident : अस्थी विसर्जनावरून परतताना बोलेरोला ट्रकची धडक; चार जण जागीच ठार, भंडारातील बेला येथील घटना
Accident News : भंडारा जिल्ह्यात बेला येथे ट्रक आणि बोलेरोमध्ये भीषण अपघात झाला. अस्थी विसर्जनावरून परतताना बोलेरोला ट्रकने जोरदार धडक दिली, यात चार जण ठार झाले.
भंडारा : राष्ट्रीय महामार्गावरून नागपूरकडे जात असलेल्या बोलेरोला समोरून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने धडक दिली. यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर, एक गंभीर जखमी झाला आहे.