चार महिन्यांच्या नकोशीला विहिरीत फेकले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

शिरजगावकसबा (अमरावती) : चांदूरबाजार तालुक्‍यातील करंजगावात रामनगर या मार्गावरील एका शेतातील कोरड्या विहिरीत चार महिन्यांच्या नकोशीचा (मुलीचा) मृतदेह आढळला. ही खळबळजनक घटना रविवारी (ता. 15) पहाटे उघडकीस आली. चिमुकलीचा खून करण्याच्या उद्देशाने, तिला विहिरीत फेकल्याची शक्‍यता आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या गावातील संजय शेषराव सोनार यांना पहाटे पाच ते साडेपाचच्या सुमारास अमर अरुण सोनार यांच्या शेतातील विहिरीजवळ चिमुकलीच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी पोलिस पाटील योगेश पवार यांच्यासह, ग्रामस्थांना माहिती दिली. पोलिसांनी दिवस उजाडल्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने त्या मुलीला विहिरी बाहेर काढले.

शिरजगावकसबा (अमरावती) : चांदूरबाजार तालुक्‍यातील करंजगावात रामनगर या मार्गावरील एका शेतातील कोरड्या विहिरीत चार महिन्यांच्या नकोशीचा (मुलीचा) मृतदेह आढळला. ही खळबळजनक घटना रविवारी (ता. 15) पहाटे उघडकीस आली. चिमुकलीचा खून करण्याच्या उद्देशाने, तिला विहिरीत फेकल्याची शक्‍यता आहे. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या गावातील संजय शेषराव सोनार यांना पहाटे पाच ते साडेपाचच्या सुमारास अमर अरुण सोनार यांच्या शेतातील विहिरीजवळ चिमुकलीच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी पोलिस पाटील योगेश पवार यांच्यासह, ग्रामस्थांना माहिती दिली. पोलिसांनी दिवस उजाडल्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने त्या मुलीला विहिरी बाहेर काढले. विहिरीत फेकताना, तिच्या शरीराभोवती एक भगव्या रंगाचा दुपट्टा गुंडाळला होता. तिला वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात नेले. डॉक्‍टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four-month-old girl thrown into the well

टॅग्स