
अकोला : अकोल्यात शुक्रवारी पुन्हा चार रुग्णांचे नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. तर १९ नमुने निगेटीव्ह असल्याचा अहवाल सायंकाळी पाच वाजता प्राप्त झाला. त्यातील एका व्यक्तीस मंगळवारी (ता. २८) मयत अवस्थेत रुग्णालयात दाखल केले होते, त्याचा अहवाल आज प्राप्त झाला. दरम्यान आता पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३२ झाली असून प्रत्यक्षात १७ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने दिली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी अखेर एकूण ६९७ नमुने पाठविण्यात आले. त्यापैकी ६७१ अहवाल आले आहेत. अखेर एकूण ६३९ अहवाल निगेटीव्ह तर ३२ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व २६ अहवाल प्रलंबित आहेत.
आजपर्यंत एकूण ६९७ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ५४४, फेरतपासणीचे ९२ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ६१ नमुने होते. आजपर्यंत एकूण ६७१ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ५२३ तर फेरतपासणीचे ८७ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ६१ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ६३९ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ३२ आहेत. शुक्रवारी प्राप्त झालेल्या २३ अहवालात १९ अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर चार अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
आता सद्यस्थितीत ३२ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील चार जण मयत आहेत. तर गुरुवारी (दि.२३) सात जण व सोमवारी (दि.२७) एका जणास व गुरुवारी (दि.३०) तिघांना असे ११ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत १७ जण उपचार घेत आहेत.
शुक्रवारी अखेर ७२७ प्रवासी आले आहेत. त्यापैकी ३२४ गृहअलगीकरणात व १०१ संस्थागत अलगीकरणात असे ४२५ जण अलगीकरणात आहेत. तर २४० जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर ६२ रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.