Foxconn-Vedanta : महत्त्वाचे प्रकल्प जाणीवपूर्वक गुजरातला

शिवसेना-संभाजी ब्रिगेडची निदर्शने; ‘फॉक्सकॉन-वेदांता’ राज्यात आलाच पाहिजे
Foxconn-Vedanta
Foxconn-Vedantasakal

सांगली : ‘फॉक्सकॉन-वेदांता’चा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. राज्यात बेरोजगारी वाढत असताना असे महत्त्वाचे प्रकल्प गुजरात राज्यात जात आहेत. हे जाणीवपूर्वक होत आहे. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. ‘वेदांता’चा प्रकल्प महाराष्ट्रात परत आलाच पाहिजे, यासाठी शिवसेना-संभाजी बिग्रेडतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, फॉक्सकॉन प्रकल्पासाठी महाविकास आघाडी सरकारने ९० टक्के चर्चा केली होती. मात्र सरकार बदलताच प्रकल्प गुजरातला गेला. याचे नेमके गौडबंगाल काय, हे जनतेला कळाले पाहिजे. यातून एक लाख रोजगार निर्माण होणार होता. एवढा मोठा प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्यातील तरुणांनी फक्त दहिहंडीच फोडत बसायचे काय, असा प्रश्न संभाजी ब्रिगेडचा आहे. गुंतवणूकदारांच्या पसंतीचे पहिल्या क्रमांकाचे राज्य महाराष्ट्र आहे. परंतु आधीचे सरकार जाताच अडीच महिन्यांत असे काय झाले की, फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेला.

फडणवीस सरकार राज्यात असताना मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्रही गुजरातला हलवले. अनेक महत्त्वाचे प्रकल्प, कार्यालयेही गुजरातला हलवलीत. याचे गांभीर्य सरकारला नाही. विद्यमान सरकारने थोडे लक्ष राज्याच्या कामकाजात दिले असते, तर एवढा मोठा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून गेला नसता. हे का झाले, याचा खुलासा महाराष्ट्र सरकारने केला पाहिजे.

शिवसेना जिल्हाप्रमुख अभिजित पाटील, जिल्हा उपप्रमुख शंभोराज काटकर, संघटक बजरंग पाटील, महिला आघाडीच्या सुजाताताई इंगळे, मनीषा पाटील, सुनंदा पाटील, संभाजी ब्रिगेडचे सुयोग औंधकर, राजेश पाटील, विजय शिंदे, रेखा पाटील, शिवसेनेचे मयूर घोडके, भगवानदास केंगार, अमोल कांबळे, धनंजय कोळपे, अनिल बाबर आदी प्रमुख सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com