esakal | नोकरीचे आमिष दाखवून तिघांना गंडा; उकळले तब्बल ८ लाख 
sakal

बोलून बातमी शोधा

Fraud of 8 lakhs done with 3 men in Yavatmal

शिक्षण घेतल्यानंतरही नोकरी लागत नसल्याने बेरोजगार तरुण चिंताग्रस्त आहेत. त्याचाच फायदा काही भामटे घेताना दिसत आहेत. नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत बेरोजगार आणि नातेवाइकांचा विश्‍वास संपादीत करतात.

नोकरीचे आमिष दाखवून तिघांना गंडा; उकळले तब्बल ८ लाख 

sakal_logo
By
सूरज पाटील

यवतमाळ : आरोग्य खात्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तिघांना गंडा घातला. संशयिताने तिघांकडून आठ लाखांची रोकड उकळली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलिसांत धाव घेण्यात आली. या प्रकरणी संशयिताविरुद्घ अवधूतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

शिक्षण घेतल्यानंतरही नोकरी लागत नसल्याने बेरोजगार तरुण चिंताग्रस्त आहेत. त्याचाच फायदा काही भामटे घेताना दिसत आहेत. नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत बेरोजगार आणि नातेवाइकांचा विश्‍वास संपादीत करतात. पैसे उकळून मग टोलवाटोलवी करतात. असे प्रकार यवतमाळ जिल्ह्यात सर्रास घडत आहेत. 

हेही वाचा - आता दुपारच्या वेळी बिनधास्त झोपा; 'हे' आहेत दुपारी झोपण्याचे फायदे

संशयित प्रफुल मुकुंद हेलोंडे (वय 40, रा. सुकळी, ता. बाभूळगाव) याने दिशांत पंढरीनाथ चोपडे याला आरोग्य खात्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी तीन लाख 85 हजार रुपये घेतले. त्याचप्रमाणे रूपक गजेंद्र शेळके (रा. तुळजापूर) याच्याकडून एक लाख 40 हजार, तर मंगेश मारोती निमसळे याच्याकडून दोन लाख 60 हजार रुपये या प्रमाणे एकूण सात लाख 85 हजार रुपये उकळले. 

ही रक्कम संशयिताने आर्णी रोडवरील विदर्भ कोकण ग्रामीण बँक अग्नीशामक दलाच्या कार्यालयाजवळ 15 जानेवारी ते 21 फेब्रुवारी 2019 या कालावधीत स्विकारली. वारंवार संपर्क साधूनही प्रफुल हेलोंडे याच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. 

क्लिक करा - राष्ट्रवादीने चोवीस तासांत बदलला निर्णय, दुसरीकडे शिवसेना रूसली

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पंढरीनाथ गोविंद चोपडे (वय 70, रा. बोरी सिंह, ता. यवतमाळ) यांनी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून प्रफुल हेलोंडे याच्याविरुद्घ गुन्हा नोंदविला.

संपादन - अथर्व महांकाळ