नोकरीचे आमिष दाखवून १५ लाखाचा गंडा

अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार - तरुणाविरुद्ध गुन्हा नोंद
fraud of 15 lakh in the name of  job offer Crime against youth Yavatmal
fraud of 15 lakh in the name of job offer Crime against youth Yavatmalsakal

यवतमाळ : नोकरीचे आमिष दाखवून दोन तरुणींची तब्बल १५ लाखांनी फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. रुपाली दादाजी ठमके (वय२८)ल रा. केसुर्ली ता. वणी ) असे फिर्यादीचे नाव आहे. विलास नामदेव मेडके (वय ३६, रा. जामनकरनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. तरुणीने चंद्रपूर येथे बारावीचे शिक्षण घेतले. दोन वर्षांपूर्वी वडिल दादाजी ठमके यांचे निधन झाले. २०१६ मध्ये विलास मेडके याच्याशी तरुणीसह मैत्रीण सपना झाडे ( रा. भालर कॉलनी) या दोघीची जुन्या बसस्टॅण्डजवळ यवतमाळ येथे ओळख झाली. त्याने वनविभागामध्ये लिपीक आहे, वनविभागातच नोकरी लावून देतो, पैसे द्यावे लागेल असे सांगितले.

तसेच गावी सुद्घा येऊन गेला. त्याने नोकरीचे आमिष दाखवून नोव्हेंबर २०१६ ते डिसेंबर २०२१ पर्यंत विविध पे नंबरवर दोन लाख ३० हजार रुपये दिले. तसेच पाच लाख २० हजार रुपये रोख स्वरुपात वेळोवेळी यवतमाळ येथे दिले. मैत्रीण सपनाकडून दोन लाख व त्यानंतर साडेपाच लाख रुपये घेतले. अशाप्रकारे दोघींची १५ लाखांनी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केली. व्याजाने व दागिने विक्री करून पैसे दिले. मात्र नोकरीबाबत विचारले तर साहेब नाही, कागदपत्र टेबलवर जायचे आहे, अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करीत असल्याने अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तरुणीने तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com