Amravati Scam : अमरावतीत कॅनडामध्ये नोकरी लावण्याचा बनाव; दोन लाख ३० हजारांची फसवणूक
Job Fraud : अमरावतीत कॅनडामध्ये नोकरी देण्याचा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. संशयिताने ₹2.3 लाखांचा गंडा घालून फरार झाल्याचा आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमरावती : कॅनडामध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून दोन लाख ३० हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. आकाश प्रकाश प्रांजळे (वय ३६, रा. साईनगर, अमरावती), असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.