४२ लाखांनी फसवणूक; हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट प्रशिक्षणाच्या नावाने लुबाडले
Tomwang112

४२ लाखांनी फसवणूक; हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट प्रशिक्षणाच्या नावाने लुबाडले

अमरावती : हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट व रिटेल मार्केटिंग वॉर्डबॉयचे प्रशिक्षण देण्यासाठी निवडलेल्या संस्थांच्या संचालकांनीच धारणीच्या एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाची ४२ लाख ५० हजारांनी फसवणूक (Cheating) केली. याप्रकरणी दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रमेश शिवाजीराव जाधव (वय ४०, रा. नाथपूरम, औरंगाबाद) व अंगद साहेबराव जाधव (वय ३९, रा. पैठण रोड, औरंगाबाद) अशी फसवणुकीसह अपहार व विश्‍वासघात (Embezzlement and betrayal) प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संस्थाचालकांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Fraud of Rs 42 lakh in Amravati)

अंगद जाधव हे जाणता राजा मल्टीपर्पज चॅरिटेबल ट्रस्ट औरंगाबाद, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष असल्याचे पोलिसांनी सांगितले. रमेश जाधव हे श्रीमंत महाराज माधवराव सिंधीयाजी फाउंडेशन औरंगाबाद व रिटेल मार्केटिंग प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. शिवाय क्रांतिज्योती प्रमिलाबाई चव्हाण महिला मंडळ, परभणी कार्यालय औरंगाबाद या संस्थेचे अधिकारपत्र रमेश जाधव यांनी मिळवून २०१३-१४ मध्ये कौशल्य विकास योजनेअंतर्गत देण्यात येणारे हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट रिअल मार्केटिंग वॉर्डबाय याचे प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव सादर केला.

४२ लाखांनी फसवणूक; हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट प्रशिक्षणाच्या नावाने लुबाडले
रक्त पातळ करणारे इंजेक्शन संपले, तरीही प्रिक्स्रिप्शनवर लिहून देण्यास डॉक्टरांची टाळाटाळ

एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय धारणी यांच्याकडून ४२ लाख ५० हजार रुपये एवढ्या रक्कमेचे काम मिळावे, याकरिता संस्थेच्या निवडप्रस्ताव दस्तऐवजांसोबत प्रादेशिक संचालनालय रोजगार व प्रशिक्षण मुंबई यांच्याकडून देण्यात येणारे बनावट व्यावसायिक प्रशिक्षण प्रदाता प्रमाणपत्र तयार केले व प्रस्ताव धारणी कार्यालयाकडे सादर केला.

महत्त्वाची बाब म्हणजे माधवराव सिंधीया फाउंडेशन औरंगाबादचे सचिव शैलेश अंभोरे हे १४ जुलै २०१४ रोजी मृत झालेले असताना त्यांच्या नावाने १९ जुलै २०१४ रोजी शंभर रुपयांच्या मुद्रांकावर त्यांची खोटी स्वाक्षरी केली व अटी शर्थीही सादर केल्या. आदिवासी प्रशिक्षणार्थी यांचे बनावट नियुक्तिपत्र तयार करून प्रकल्प कार्यालय धारणी येथे सादर केले. संगनमताने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी धारणी प्रकल्प कार्यालयाची फसवणूक केली. प्रकल्प कार्यालय धारणी येथील किशोर बालू पटेल यांनी धारणी पोलिसांत तक्रार केली असता याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.

नियुक्तिपत्रेही निघाली बनावट

या योजनेच्या अटी व शर्थीनुसार २० टक्के प्रशिक्षणार्थ्यांना नोकरी देणे बंधनकारक होते. परंतु प्रत्यक्षात तसे न करता डॉक्‍टरांच्या नावाने बनावट नोकरीचे नियुक्तिपत्र व वेतनाचा तपशील शासनाकडे सादर केल्याची बाब तपासात उघडकीस आली.

(Fraud of Rs 42 lakh in Amravati)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com