Chandrapur News: घरकुल लाभार्थ्यांची मोफत वाळू उपक्रमाला पाठ; वाहतुकीचा खर्च परवडेना, ४९ हजारांवर लाभार्थ्यांचा नकार
Free Sand Scheme: घाटांचे लिलाव रखडल्यामुळे वाळूचा पुरवठा ठप्प झाला आणि घरकुल लाभार्थ्यांना वाळू खरेदी करणे कठीण झाले. राज्य सरकारने मोफत वाळू योजना सुरू केली, पण वाहतूक खर्चामुळे केवळ काही लाभार्थ्यांनीच याचा लाभ घेतला.
चंद्रपूर : घाटांचे लिलाव रखडल्याने वाळूचा पुरवठा ठप्प झाला. माफियांकडून वाळू खरेदी करणे सामान्यांना परवडत नव्हते. त्यामुळे घरकुलांची बांधकामे थांबली आणि अनेकांचे घराचे स्वप्न भंगले. यावर उपाय म्हणून राज्य शासनाने मोफत वाळू उपक्रम सुरू केला.