आश्रमशाळांमधील अत्याचारांची नव्याने चौकशी - विष्णू सवरा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

नागपूर - नाशिक जिल्ह्यातील तिल्लोरी येथील आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या अत्याचाराची नव्याने चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी आज विधानसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासात केली.

नागपूर - नाशिक जिल्ह्यातील तिल्लोरी येथील आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या अत्याचाराची नव्याने चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी आज विधानसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासात केली.

या संदर्भात निर्मला गावित (इगतपुरी) यांनी प्रश्‍न विचारला होता. या प्रश्‍नावरून सवरा यांना घेरण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला. सवरा सभागृहाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. निर्मला गावित, प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड यांनी आदिवासी विकासमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. आश्रमशाळांमधील विद्यार्थिनीने व पालकांनी अत्याचाराच्या विरोधात उपोषण केले आहे, हे खरे आहे काय, असा प्रश्‍न विरोधकांनी केला. यावर सवरा यांनी उपोषण झालेच नसल्याचा दावा केला. विरोधकांनी वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या बातम्यांचा दाखला दिल्यानंतर सवरा यांनी नव्याने चौकशी करण्याचे आश्‍वासन सदस्यांना दिले.

इबीसी सवलतीसाठी मुदतवाढ
ईबीसी सवलतीची रक्कम महाविद्यालयांना भरण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ दिल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली.

पुणे विभागातील व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थी ईबीसी सवलतीपासून वंचित असल्याबद्दल मेधा कुलकर्णी (कोथरूड) यांनी प्रश्‍न विचारला होता. काही खासगी महाविद्यालयांना न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे ईबीसी सवलत लागू केली आहे. ईबीसी सवलतीची रक्कम न मिळाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देत नसल्याचे भाजपर्ले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी निदर्शनास आणून दिले. यासाठी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, अशी सूचना त्यांनी केली. यावर विनोद तावडे यांनी ईबीसी सवलतीची रक्कम भरण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा केली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना 50 टक्के शुल्क भरणेही कठीण असून, त्यांच्यासाठी सरकारने कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना राजेश टोपे यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fresh inquiry against ashramshala crime