
मेहकर : घरात अठरा विश्वे दारिद्र्य, हलाखीच्या परिस्थितीमुळे शिक्षण घेणे अवघडच होते. तरीही मुलींना शिक्षण देण्यासाठी आई, वडिलांनी काबाडकष्ट केले आणि मुलींनी त्यांच्या मेहनतीची जाण ठेवत कठोर मेहनतीने अभ्यास केल्यामुळे आरती व राधा या दोन मुलींनी गगनभरारी घेतली. त्यांचे डॉक्टरकीचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे.