

Gadchiroli News
esakal
गडचिरोली: जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील लाचखोरीचा आणखी एक प्रकार उघडकीस आला असून जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी लाच स्वीकारणाऱ्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून रंगेहात पकडल्याची कारवाई गुरुवारी (ता. २) करण्यात आली. याप्रकरणी आरोपींविरुद्ध गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.