

Kurkheda Gadchiroli News 50 Historic Veergal Sculptures Discovered Near Andhali Village Reveal Ancient Warrior Traditions
sakal
कुरखेडा (जि. गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि पुरातत्त्वीय वारसा उजेडात आणणाऱ्या संशोधन मोहिमेत कुरखेडा तालुक्यातील आंधळी गावाजवळ घनदाट जंगलात सोळाव्या अन् सतराव्या शतकातील सुमारे ५० वीरगळांचा शोध लागला आहे. पुरातत्त्व संशोधक डॉ. रघुनाथ बोरकर यांनी केलेल्या या शोधमोहिमेत नंदकिशोर नैताम आणि रमेश कोरचा सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, या वीरगळांपैकी काही भग्नावस्थेत, तर काही सुस्थितीत असून ऊन, वारा आणि पावसाचा मारा सहन करीत आजही इतिहासाची साक्ष देत उभे आहेत.