

Gadchiroli Flood Rescue
esakal
गडचिरोली: एकीकडे सरकार विकासाच्या घोषणा करत असताना जिल्ह्यात झालेला मुसळधार पाऊस विकासाचे बेगडी रूप उघड करत आहे. भामरागडसारख्या अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या अजूनही कायमच असल्याचे यात दिसून आले. बिनागुंडा येथील एका व्यक्तीला अस्वलाने गंभीर जखमी केल्यानंतर त्याला स्ट्रेचरवर पूर आलेल्या ओढ्यांमधून तब्बल १८ किमीचा प्रवास करून दवाखान्यात पोहोचवावे लागल्याची घटना उजेडात आली आहे.