Gadchiroli Crime: “गडचिरोलीत नात्याला काळिमा! १३ वर्षीय पुतणीवर काकाचा तीन वर्षे अत्याचार; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल”
Gadchiroli News: गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच काकाने तीन वर्षे अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
भामरागड (जि. गडचिरोली) : तालुक्यातील एका गावात नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच काकाने तब्बल तीन वर्षे वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.