Gadchiroli Rain : गडचिरोली जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस; भामरागड, मुलचेरा तालुक्यासह काही परीसरांचा तुटला संपर्क

गडचिरोली जिल्ह्यात रविवारपासून अधूनमधून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड, मुलचेरा तालुक्यासह काही परीसरांचा संपर्क तुटला आहे.
Gadchiroli Rain Water
Gadchiroli Rain Watersakal
Updated on

गडचिरोली - जिल्ह्यात रविवारपासून अधूनमधून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड, मुलचेरा तालुक्यासह काही परीसरांचा संपर्क तुटला आहे.

भामरागड तालुक्याच्या काठावरून वाहत असलेल्या पर्लकोटा नदीवरचा पूल ठेंगणा असल्याने येथे नव्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. पण नव्या पुलाचे बांधकाम अद्याप पूर्ण झाले नाही आणि रविवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे जुना ठेंगणा पूल नदीत बुडाला. त्यामुळे भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला आहे. नव्या पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com