
गडचिरोली : घरोघरी विघ्नहर्त्या विनायकाचे आगमन होत असताना गडचिरोली जिल्ह्यातील माओवादाचे विघ्नही विलयास जाताना दिसत आहे. कोपर्शी जंगल परिसरात झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलिसांनी चार जहाल माओवाद्यांना कंठस्नान घातले. मृत माओवाद्यांमध्ये एक पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे.