

Gadchiroli
esakal
गडचिरोली: जिल्हा खनिकर्म प्राधिकरणाअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांच्या कोट्यवधींच्या निधीवर डल्ला मारण्याच्या हेतूने जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट लेटरहेड व स्वाक्षरीने प्रशासकीय मान्यता दिल्याचे पत्र देण्यात आले होते. या प्रकरणी चामोर्शी नगरपंचायतीचा स्वीकृत नगरसेवक आशिष पिपरे यास पोलिसांनी रविवार (ता.२८) रात्री छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली. न्यायालयाने पिपरे यास ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.