esakal | गडचिरोली : ऐन पोळ्याच्या दिवशी वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
sakal

बोलून बातमी शोधा

tiger

गडचिरोली : ऐन पोळ्याच्या दिवशी वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : ऐन पोळ्याच्या दिवशी शेळ्या चराईसाठी गेलेल्या एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. मृताचे नाव नामदेव गेचू गुडी (वय ६५, रा. धुंडेशिवनी) असे आहे. ही घटना सोमवारी (ता. ६) सकाळी ११ वाजता महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक १ मध्ये घडली.

नामदेव गुडी शेळ्या घेऊन चराईसाठी गेले असता वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून गुडी यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.

विशेष म्हणजे, मागील दोन महिन्यांत वाघाने घेतलेला हा चौथा मनुष्यबळी आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने हल्लेखोर वाघाला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू केले असून दोन ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत.

loading image
go to top