

Gadchiroli Youth Ignatius Bada Overcomes Hardships Completes Education in Australia and Joins Lloyds Metals as Management Trainee
sakal
गडचिरोली: गडचिरोलीतील अतिदुर्गम बांदे गावातील इग्नासियस प्रकाश बाडा याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ऑस्ट्रेलियातील कर्टिन विद्यापीठातून उच्च शिक्षण पूर्ण केले आणि आता मायभूमीत परतून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली. विशेष म्हणजे लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडने त्याची मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून नियुक्ती केली.