

Gadchiroli Farmers
ESakal
गडचिरोली जिल्ह्यात प्रस्तावित विमानतळ आणि एमआयडीसी प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भूसंपादनामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या अन्यायकारक भूसंपादनाविरोधात बाधित भागातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे धाव घेत मनसे नेते राजू उंबरकर यांच्याकडे निवेदने सादर केली आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः गडचिरोलीत येऊन यावर तोडगा काढावा आणि बळीराजाला न्याय मिळवून द्यावा, अशी आर्त हाक बाधित शेतकऱ्यांनी घातली आहे.