

Gachiroli News
esakal
गडचिरोली: उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच अगदी चैत्र महिन्यातच गडचिरोली जिल्ह्यास उष्णतेच्या झळा बसत असून वैशाखापूर्वीच वाढलेल्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
उन्हाचा तडाखा वाढला असून मार्चअखेरीस तापमान ३८ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. सकाळी १० वाजतापासूनच सूर्याची प्रखर किरणे अंगाची लाहीलाही करत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. एप्रिल सुरू होण्यापूर्वीच उन्हाचा हा 'रुद्रावतार' पाहून आगामी मे आणि जून महिन्यांत तापमान किती वाढणार, या चिंतेने नागरिकांना आतापासूनच धडकी भरली आहे.