Gadchiroli News: भीषण उष्णतेने गडचिरोली जिल्ह्याची होरपळ;उन्हाच्या झळा असहनीय; तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्याने नागरिक झाले हैराण

Gadchiroli Faces Severe Heatwave; Temperatures Cross 44°C: गडचिरोली जिल्ह्यात भीषण उष्णतेने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तापमान ४३-४४°C पर्यंत पोहोचल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
Gadchiroli News

Gadchiroli News

esakal

Updated on

गडचिरोली: जिल्ह्याला भीषण उष्णतेच्या झळा बसू लागल्या आहेत. कडाक्याच्या उन्हामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिक पूर्णपणे हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत असून, नागरिकांचे घराबाहेर पडणे टाळत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्याचे कमाल तापमान ४३ ते ४४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले जात आहे. किमान तापमानही २८ अंशांवर गेल्याने रात्रीही उकाडा कायम आहे. आर्द्रता केवळ १५ ते २० टक्क्यांवर आल्याने वातावरण कोरडे व रखरखीत झाले आहे. ग्रामीण व जंगलव्याप्त भागात तर उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे शहरात शीतपेयांची मागणी प्रचंड वाढली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com