

Timber Smuggling
esakal
एटापल्ली (जि. गडचिरोली): एटापल्ली वनपरिक्षेत्रातील मोहुर्ली उपवन क्षेत्रात वनविभागाने सागवान तस्करांविरोधात मोठी कारवाई करत अंदाजे ६० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्राप्त माहितीनुसार, एपी २९ टीए ६९५४ क्रमांकाचा टाटा कंपनीचा ट्रक मोठ्या प्रमाणात सागवान लाकूड घेऊन जात असल्याचे वनरक्षक राकेश मडावी यांच्या निदर्शनास आले. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी नीलिमा खोब्रागडे यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेत ट्रक ताब्यात घेतला.