Gadchiroli : जप्त करण्यात आलेले स्फोटकांनी भरलेले कुकर

नक्षल्यांनी पुरून ठेवलेले स्फोटक साहित्य केले हस्तगत
कुकर
कुकरsakal

गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा पोलिस मदत केंद्राच्या हद्दीमध्ये लड्डुडेरा (हेटळकसा) जंगल परिसरात नक्षल्यांनी पुरून ठेवलेले स्फोटक साहित्य जप्त करण्यात पोलिस विभागाला यश आले आहे.

नक्षलवादी शासनविरोधी विविध घातपाती हिंसक कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्याचा वापर करतात व ते साहित्य सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या उद्देशाने गोपनियरित्या जंगल परिसरात जमिनीमध्ये पुरून ठेवतात. अशा पुरून ठेवलेल्या साहित्यांच्या वापर नक्षलवाद्यांकडून नक्षल सप्ताह तसेच इतर प्रसंगी केला जातो. मंगळवार (ता. ११) दुपारी १२ वाजता उपविभाग कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या मालेवाडा पोलिस मदत केंद्राच्या हद्दीमध्ये मौजा लड्डुडेरा (हेटळकसा) जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी पोलिस पथकांना नुकसान पोहचवून मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात दारूगोळा, स्फोटके व इतर साहित्य पुरून ठेवले असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

त्या आधारे विशेष अभियान पथक गडचिरोली व बी.डी.डी.एस. (बाॅम्ब शाेधक व नाशक पथक) पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना एका संशयीत ठिकाणी लपवून ठेवलेली स्फोटके व इतर साहित्य शोधुन काढण्यात जवानांना यश आले आहे. या साहित्यामध्ये २ नग जिवंत कुकर, 2२नग क्लेमोर, १ नग पिस्टल, २ नग वायर बंडल व पाणी साठवण्याचा १ नग जर्मन गंज आदी नक्षल साहित्याचा समावेश आहे. हे साहित्य हस्तगत करून घटनास्थळावर मिळालेल्या मुद्देमालावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. यात स्फोटकांनी भरलेले २ नग कुकर व २ नग क्लेमोर हे बीडीडिएस पथकाच्या मदतीने अत्यंत सतर्कतेने जागेवरच नष्ट करण्यात आले असून इतर साहित्य गडचिरोली येथे आणण्यात आले आहे. गडचिरोली पोलिस दलाकडून पुढील कारवाई सुरू आहे.

ही कामगिरी पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक(अभियान) सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक(अहेरी) अनुज तारे यांच्या मार्गदर्शनात पार पडली. अभियानात सहभागी असलेल्या विशेष अभियान पथक गडचिरोली व बी.डी.डी.एस. पथकाच्या जवानांचे पोलिस अधीक्षक अंकीत गाेयल यांनी कौतुक केले आहे. तसेच जिल्हाभरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आल्याचे सांगितले असून नक्षलवाद्यांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करून सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com