

Gadchiroli News
esakal
गडचिरोली: सर्च आणि मुंबई येथील द स्पाईन फाउंडेशनच्या वतीने २६ आणि २७ मार्च या दोन दिवसांत मणक्याच्या गुंतागुंतीच्या ३४ शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आल्या. आदिवासी भागात शिबिराच्या माध्यमातून मणक्यांच्या शस्त्रक्रियेचा हा सर्वांत मोठा उपक्रम ठरला आहे. सन २००७ पासून सुरू असलेल्या उपक्रमात आतापर्यंत एकूण ५६१ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.