गडचिरोली : सूरजागड खाण विरोधी रॅलीत; दोन जहाल माओवादी जेरबंद

सूरजागड खाणीच्या उत्खननाच्या विरोधात परिसरातील जनतेचे आंदोलन सुरू आहे
Vidarbha
VidarbhaSakal
Updated on

गडचिरोली : सूरजागड खाणीच्या विरोधात एटापल्ली येथे निघालेल्या रॅलीत सहभागी झालेला जहाल नक्षलवादी मुडा मासा झोही याच्यासह दोन माओवाद्यांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.

सूरजागड खाणीच्या उत्खननाच्या विरोधात परिसरातील जनतेचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाअंतर्गत मंगळवारी एटापल्ली येथे रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत काही नक्षलवादी सहभागी होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीवरून विशेष अभियान पोलिस पथकातील साध्या वेशातील जवान गुप्तपणे या रॅलीत ठेवले होते. त्यांना या रॅलीत मुडा मासा झोही व दुसरा एक माओवादी सदस्य मैनू दोरपेटी हे दोघे सहभागी असल्याचे दिसून आले. त्यांनी लगेच कारवाई करून दोघांनाही जेरबंद केले.

Vidarbha
पिंपरी-चिंचवड शहरात होणार १३९ नगरसेवक

मुडा मासा झोही (वय ३२) हे एटापल्ली तालुक्यातील (जि. गडचिरोली) गोरगुट्टा येथील रहिवासी आहे. तो नक्षल्यांच्या गट्टा दलममध्ये सशस्त्र दलम सदस्य होता. झारेवाडा (२७ फेब्रु. १९), बोडमेटा (१५ मार्च २०) व कोपर्शी (४ मार्च २१) येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्‍ल्यात सहभागी होता. त्याच्यावर २ लाखांचे बक्षास जाहीर झाले आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेला दुसरा नक्षली मैनू दोरपेटी हा नक्षल्यांच्या जनमिलीशियाचा सदस्य असून तो एटापल्ली तालुक्यातीलच बोडमेटा या गावातील रहिवासी आहे. त्याच्यावरही २ लाखांचे बक्षीस होते. ही कारवाई पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, समीर शएख, अनुज तारे यांच्या नेतृत्वात पार पाडण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com