Gadchiroli News: रुग्णालयासमोर अतिक्रमणाचा विळखा; रुग्णवाहिकांना अडथळा; प्रशासन निष्क्रिय, नागरिक त्रस्त

Impact on Ambulance Movement and Patient Safety: गडचिरोली महिला व बाल रुग्णालयासमोरील अतिक्रमणामुळे रुग्णवाहिकांना अडथळा; प्रशासन निष्क्रिय, नागरिक त्रस्त; तातडीने कारवाईची मागणी.
Gadchiroli News

Gadchiroli News

esakal

Updated on

गडचिरोली: शहराच्या मध्यवर्ती भागातील जिल्हा महिला व बाल रुग्णालयासमोरील मोकळ्या जागेवर अतिक्रमणधारकांनी पुन्हा कब्जा केला असून, परिस्थिती गंभीर बनली आहे. काही व्यावसायिकांनी टिनपत्र्यांचे शेड उभारून आणि विटांचे बांधकाम करून पक्की दुकाने थाटली. रुग्णालयासारख्या अत्यंत संवेदनशील ठिकाणी होत असलेल्या या अतिक्रमणाकडे नगर परिषद व महसूल प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com