बाराभाईचा गणपती पूजनाने अकाेल्यात मिरवणुकीस प्रारंभ

याेगेश फरपट, सुगत खाडे 
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

श्री गणेश विसर्जन मिरवणूकीत काेणताही अडथळा येणार नाही याची पूर्ण खबरदारी जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली आहे. मिरवणूकीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर आहे. याशिवाय  अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात पथके सुद्धा लक्ष ठेवून आहेत. गणेश भक्तांनी शांतता व सुव्यवस्था राखून गणेश विसर्जन मिरवणूकीचा आनंद घ्यावा. काेणतीही अडचण असल्यास तत्काळ पाेलिसांशी संपर्क साधावा.
- आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हाधिकारी, अकाेला.

अकाेला : श्री. बाराभाई गणपती पूजनाने अकाेल्यात गणेश विसर्जन मिरवणूकीस प्रारंभ झाला. मानाचा गणपती म्हणून आेळखल्या जाणाऱ्या श्री. बाराभाई गणपतीचे पूजन मान्यवर लाेकप्रतिनिधी तसेच जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या हस्ते झाले. 

यावेळी गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धाेत्रे, आमदार रणधिर सावरकर, आमदार गाेवर्धन शर्मा, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, महापौर विजय अग्रवाल, माजी महापौर सुमनताई गावंडे, श्री. सार्वजनिक गणेशाेत्सव मंडळाचे अध्यक्ष ॲड. माेतिसिंह माेहता, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा पाेलिस अधिक्षक एम. राकेश कलासागर यांनी गणपती पूजन केले. यानंतर गणरायाला आरती आेवाळण्यात आली. श्री. बाराभाई गणपती मंडळातर्फे प्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी अतिरिक्त पाेलिस अधिक्षक विजयकांत सागर, महापालिका आयुक्त अजय लहाने, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, उपविभागीय पाेलिस अधिकारी उमेश माने पाटील, तहसिलदार राजेश्वर हांडे उपस्थित हाेते. गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसत आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासोबतच घरामध्ये आस्थेने बसविण्यात आलेल्या गणेशाला निराेप देण्यासाठी महापालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या गणेश घाटावर गणेश भक्तांनी गर्दी केली आहे. कुटूंबासह याठिकाणी आराधना करीत आपल्या लाडक्या बाप्पाला निराेप दिला जात आहे. 

Web Title: Ganesh Festival 2017 Akola Ganesh Utsav Ganesh Visarjan

व्हिडीओ गॅलरी