गणेश विसर्जन करताना दोघांचा मृत्यू; दोघे बेपत्ता

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

अमरावती : भातकुली तालुक्‍यातील वाठोडा शुक्‍लेश्वर गावात गुरुवारी (ता.12) सायंकाळी पूर्णा नदीपात्रात गणेश मूर्तींचे विसर्जन करताना गावातील चारजण बुडाले. घटना घडली त्यावेळी परिसरात पाऊस सुरू होता. बुडालेले चारहीजण सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी पाण्यात उतरले होते. ग्रामस्थांनी बुडालेल्या युवकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालयातील शोध व बचाव पथकालासुद्धा घटनास्थळी पाचारण करण्यात आले. उशिरा रात्री बुडालेल्या चौघांपैकी दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अमरावती : भातकुली तालुक्‍यातील वाठोडा शुक्‍लेश्वर गावात गुरुवारी (ता.12) सायंकाळी पूर्णा नदीपात्रात गणेश मूर्तींचे विसर्जन करताना गावातील चारजण बुडाले. घटना घडली त्यावेळी परिसरात पाऊस सुरू होता. बुडालेले चारहीजण सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी पाण्यात उतरले होते. ग्रामस्थांनी बुडालेल्या युवकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालयातील शोध व बचाव पथकालासुद्धा घटनास्थळी पाचारण करण्यात आले. उशिरा रात्री बुडालेल्या चौघांपैकी दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आल्याची माहिती पोलिसांनी दिली. सागर अरुण शेंदुरकर (वय 20) आणि संतोष वानखडे (वय 45) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. ऋषीकेश बाबुराव वानखडे (वय 18) आणि सतीश सोळंके यांचा अद्यापपर्यंत ठावठिकाणा लागला नाही. शोधकार्य सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh immersion, death of two; two disappeared