हे आहेत तरी कोण?कारागृहातील बंदी की कलावंत मूर्तीकार?

ganeshmurti
ganeshmurti
Updated on

अमरावती :  कधीतरी जाणता अजाणता हातून गुन्हा घडतो आणि बंदीवानाचे जिणे वाट्याला येते. घर कुटुंबापासून दूर कायमचे बंदिस्त आयुष्य. मात्र कोणतीच व्यक्ती मूळात वाईट'नसते. परिस्थिती तिला वाईट बनवित असते. या तत्वज्ञानावर विश्वास ठेऊन कारागृह प्रशासन कैद्यांसाठी विविध प्रयोग राबवित असते. असाच एक प्रयोग अमरावती कारागृहातही राबविण्यात आला. आणि त्यातून साकारल्या रेखीव सुबक अशा पाचशे गणेशमूर्ती.

चार महिन्यांपासून अथक प्रयत्न करून याच बंदींनी आपल्यातील कल्पकतेचा परिचय दिला. तब्बल पाचशे गणेशमूर्ती तयार करून त्यांनी विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या.
जवळपास दहा बंदी यासाठी अहोरात्र मेहनत करीत होते. शाडू मातीपासून या मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. आकर्षक रंगसंगती, रेखीव कलाकुसर असलेल्या या घरगुती मूर्तींची किंमत सातशे ते नऊशे रुपयांपर्यंत आहे. बंदींनी गणेशमूर्ती साकारण्याचा हा प्रयोग तीन वर्षांपासून सुरू आहे. त्यासाठी या बंदींनी विशेष प्रशिक्षणसुद्धा घेतले. कारागृह प्रशासनाने त्यांना मदतीचा हात दिला.

तहान भूक विसरून या कैद्यांनी कमीतकमी वेळात या गणेशमूर्ती घडविल्या आहेत. जेल क्वार्टर परिसरात रस्त्याच्या कडेला कारागृहाच्या जागेत नवीन शोरूम उभारण्यात आले असून, गणेशमूर्ती विक्रीपासून या केंद्राचा शुभारंभ झाला आहे. कोरोना विषाणूच्या संकटामुळे विक्री केंद्राचे उद्‌घाटन करण्यात आले नाही. परंतु मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

कारागृह सुधारगृह व्हावे, यासाठी प्रयत्न
कारागृहात राहत असताना सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी, उर्वरित आयुष्य आनंदी जावे, या उत्साहाने बंदींनी मूर्ती तयार करण्याच्या उपक्रमात सहभाग घेतला. कारागृह हे सुधारगृह व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहे.
रमेश कांबळे
अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह अमरावती.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com