Gondia Crime : भंडगा येथे महिलेच्या घरात आढळला गांजा; एक लाख तीन हजारांचा मुद्देमाल जप्त

गोंदिया जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत भंडगा येथे छापा टाकून एका महिलेच्या घरातून ९३४ ग्रॅम गांजा केला जप्त.
Ganja Seized

Ganja Seized

sakal

Updated on

गोंदिया - जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने गोरेगाव तालुक्यातील भंडगा येथे छापा टाकून एका महिलेच्या घरातून ९३४ ग्रॅम गांजा जप्त केला. गुरुवारी (ता. ११) केलेल्या या कारवाईत पथकाने गांजासह मोबाइल असा एकूण एक लाख तीन हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत महिलेलाही ताब्यात घेतले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com