
चंद्रपूर : अंचलेश्वर वॅार्डात गॅसचा स्फोट होऊन घर जळाले.अग्निशमन विभागाला माहिती दिल्यानंतर ते विलंबाने आले. त्यामुळे नागरिकांनी अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर संताप व्यक्त केला. बल्लारपुरात शहराच्या मध्यभागी असलेल्या असलेल्या हॅाटेल स्केवर पाइंटरला रविवारी आग लागली. या आगीवर तासाभरानंतर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन विभागाला यश आले. या आगीत हॅाटेलमधील फर्निचर जळाले.