
बुलडाणा : राज्यातील गुइलेन बॅरे सिंड्रोम (जी.बी.एस.) विषाणूंचा तसेच अन्य साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. हे रोखण्याकरिता पिण्याच्या पाण्याचा श्रोतांची, वितरण बिंदूच्या शाळा, अंगणवाडी, घरे इत्यादी ठिकाणच्या पाणी नमुन्यांचे, गावातील प्रशिक्षित महिला, स्वयंसेवकामार्फत ग्रामपंचायत स्तरावर निर्जंतुकीकरण करा, तसेच प्रत्येक महिन्यातून एकदा जैविक क्षेत्रीय तपासणी संचाद्वारे तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.