Vidarbha : चिखली दहशतमुक्त करा : आमदार महाले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mahale

चिखली दहशतमुक्त करा : आमदार महाले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिखली : शहरात दिवसेंदिवस निष्पाप व निरपराध नागरिकांवर दिवसाढवळ्या पिस्तुल, तलवारी, चाकू, फायटरने हल्ले करून नागरिकांचे मुडदे पाडत आहे. सोबतच वाटमारी, दरोडे, टाकून नागरिकांना लुटण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे चिखली नगरवासी प्रचंड दहशतीमध्ये असल्याने गुन्हेगारांना तात्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा करून चिखली शहर दहशत मुक्त करण्याची मागणी आमदार महाले यांनी एसपींकडे निवेदनाव्दारे केली आहे.

यासंदर्भात त्यांनी निवेदनात, शहराच्या जयस्तंभ चौकातील मुख्य रस्त्यावरील आनंद इलेक्ट्रॉनिक या दुकानात दरोड टाकत व्यापऱ्याचा खून होतो. त्यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडलेली असून आघाडी सरकारच्या काळात जिकडेतिकडे लूटमार सुरू असल्याचे चित्र आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते व चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष मा सतिशजी गुप्त यांच्यावर औरंगाबाद नाशिक रस्त्यावर प्राणघातक हमला होऊन त्यात ते जबर जखमी झालेले आहे. श्याम वाकदकर हल्ल, भावसार कलेक्शनवर जबरी लूटमार, केळवद बँक लूट प्रकरण, उंद्री व शेलूद बँक लूट असे अनेक प्रकरण घडले आहे. केळवद येथिलच पैशासाठी एका वृद्धेचा खून करण्यात आलेला आहे .

कमलेश पोपट यांच्यावरील हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता दरोडेखोर नराधमांना कायद्याचा कोणताही धाक नसल्याचे दिसत नाही एव्हढे ते सराईत वाटत आहे.शहरात व जिल्ह्यात पुन्हा अशा घटना घडू नये याकरिता पोलीस प्रशासनाने अधिक जागरूक राहण्याची गरज आहे. त्यामुळे पोलीस व जिल्हा प्रशासनाने तातडीने यादृष्टीने पाऊले उचलली पाहिजे. यातील आरोपींना तातडीने जेरबंद करून कठोर शिक्षा करावी अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन कठोर पाऊले उचलावे लागतील याची नोंद घेण्याचा इशारा सुद्धा निवेदनात देण्यात आलेला आहे.

loading image
go to top