Yavatmal Accident: शिक्षकांना ने-आण करणाऱ्या ट्रॅव्हलरला ट्रकची धडक; १२ शिक्षक जखमी, चार गंभीर, जीवितहानी नाही
Accident News: यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे ट्रक आणि ट्रॅव्हलर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल १२ शिक्षक जखमी झाले असून, त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे.
घाटंजी (जि.यवतमाळ) : शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या रसिकाश्रय संस्थेजवळ दि. २० ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास ट्रक व ट्रॅव्हलर यांचा भीषण अपघात झाला.