Yavatmal News: घाटंजीत पांदण रस्ते ठप्प; पावसाळ्याच्या तोंडावर शेतकरी त्रस्त; प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह

Farmers Struggle Due to Neglected Infrastructure:घाटंजी तालुक्यात पांदण रस्त्यांची कामे पावसाळ्याच्या तोंडावर अद्याप सुरू नाहीत. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.
Yavatmal News

Yavatmal News

esakal

Updated on

घाटंजी : शासनाच्या स्पष्ट आदेशानंतरही तालुक्यातील पांदण रस्त्यांची कामे सुरू न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कागदोपत्री योजना आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यामधील दरी वाढत असून, त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

शेतात जाण्या-येण्यासाठी आवश्यक असलेले पांदण रस्ते विकसित करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले होते. मुख्यमंत्री व महसूलमंत्र्यांनी याबाबत मोठ्या घोषणा करीत कार्यपद्धती जाहीर केली. २४ डिसेंबर २०२५ रोजी शासन निर्णयाद्वारे समित्यांची रचना, जबाबदाऱ्या व कामकाजाची रूपरेषा निश्चित करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com