अंनिसच्या दरा-याने चमत्कारचे भूत गायब !

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

बेला (जि.नागपूर) :  मानोरी येथील एका घरी 22 वर्षीय विवाहित महिला व तिच्या तीन महिन्याच्या बालिकेवर नकळत गुलाल येऊन पडत होता. कधीकधी मुलीची कपड्‌याची बाहुलीसुद्धा अचानक येऊन पडायची. या प्रकाराने कुटुंबीय घाबरून गेले होते. मात्र या घटनेची अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडे तक्रार करण्यात आली. अनिंसच्या भांडाफोडीच्या धाकाने एकाएकी हा प्रकार बंद झाला. प्रकरणाचा छडा लागण्यापूर्वीच अंधश्रद्धेचा हा प्रकार बंद झाल्याने त्र्रस्त कुटुंबीयांनी सुटकेचा श्वास सोडला. 

परिसरातील कुटुंबात अंधश्रद्धेची दहशत पसरवण्याचा हा प्रकार गेल्या सहा महिन्यापासून सुरू होता. गुलाल, बाहुलीमुळे ही महिला बेशुद्ध पडत होती, तर बालिका दमछाक होईस्तोवर रडत होती. त्यामुळे कुटुंबीय त्रस्त झाले होते. हा प्रकार बंद व्हावा, यासाठी अनेक डॉक्‍टरांकडे तिला उपचारासाठी नेण्यात आले. त्यामध्ये उपचारावर अंदाजे दोन लाख रुपये कुटुंबियांनी खर्च केले. पण तरीही गुलाल, बाहुली येउन पडणे बंद झाले नव्हते. त्यामुळे कुटुंबीय भयभीत झाले होते. शेवटी एका शिक्षकाच्या सल्ल्यावरून कुटुंबातील युवकाने बेलोरा येथील अंनिसचे संघटक उत्तम पराते व उमरेडचे सुरेश झुरमुरे यांच्याकडे धाव घेतली. त्यांच्याकडे लेखी तक्रार दिली. 20 सप्टेंबरला तक्रार मिळाल्यानंतर रविवारी (ता.22) अंनिसच्या वतीने या प्रकरणाचा छडा लावण्यात येणार होता. दरम्यान याची गुप्त चाहूल लागल्यामुळे गुलाल, बाहुलीचा चमत्कारिक खेळ बंद झाला. त्यामुळे कुटुंबीयांची त्रासापासून मुक्त झाली. 
भौतिक बलाशिवाय कोणतीही वस्तू येऊन पडत नाही, असा सिद्धांत असताना घरी आपोआप गुलाल, बाहुली येऊन पडते, यातून अंधश्रद्धा पसरविण्यात येत होती. या प्रकरणाचा भंडाफोड झाला असता तर दोषी व्यक्ती पकडल्या गेली असती. पण भांडाफोडच्या धाकाने हा प्रकार ताबडतोब बंद झाला आहे. 
सुरेश झुरमुरे 
प्रकल्प समन्वयक 
जादूटोणा विरोधी परिष
द 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The ghost of miracles disappears by the price of Annis!