esakal | दर्यापूर, अचलपूरची जागा रिपाइंला द्या
sakal

बोलून बातमी शोधा

दर्यापूर, अचलपूरची जागा रिपाइंला द्या

दर्यापूर, अचलपूरची जागा रिपाइंला द्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दर्यापूर, अचलपूरसह आठ जागा रिपाइंला कॉंग्रेसने द्याव्या; अन्यथा आघाडीतून बाहेर पडू, असा इशारा रिपाइं (ग)चे राष्ट्रीय नेते डॉ. राजेंद्र गवई यांनी शनिवारी रविभवन येथे पत्रकार परिषदेत दिला.
लोकसभेत स्वतंत्र निवडणूक लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला भाजपची "बी' टीम असल्याचा आरोप कॉंग्रेस आघाडीतर्फे केला जात होता. आम्ही स्वतंत्र लढलो तर आम्हालाही बदनाम केले जाईल. कॉंग्रेस पराभूत होत असलेल्या जागाही सोडण्याची तयार नसेल तर आघाडीत कशाला राहायचे, असे गवई म्हणाले. लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजप-शिवसेनेला पराभूत करण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला साथ दिली. अमरावती येथून आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांना निवडून आणले. विधानसभेसाठी आम्हाला जास्त जागा सोडाव्या लागतील. विधानसभेसाठी आम्ही कॉंग्रेसकडे आठ जागांची मागणी केली आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर व अचलपूर या दोन मतदारसंघाचाही समावेश आहे. दोन्ही मतदार संघातून कॉंग्रेस अनेक वर्षांत निवडून आली नाही. येथे रिपाइं स्वतंत्र लढल्यास दुसऱ्या क्रमांकावर राहते. तेव्हा दोन्ही जागा रिपाइंसाठी सोडाव्या, अशी मागणी आम्ही केली आहे. परंतु, कॉंग्रेस यावर काहीही बोलण्यास तयार नाही. दर्यापूरच्या जागेवर मला लढण्यास सांगत आहे. मात्र, मी अचलपूरवरून लढणार आहे. आघाडीने या दोन जागा न दिल्यास रिपाइं स्वतंत्रपणे 50 जागा लढवेल, असेही डा. गवई यांनी सांगितले.

loading image
go to top