कुंभमेळ्यात जाण्यापेक्षा, विद्यापीठात शिकण्यासाठी जा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

नागपूर : कुंभमेळ्यात जाण्यापेक्षा हॉवर्ड आणि ऑक्‍सफोर्ड यासारख्या विदेशी विद्यापीठांत शिकण्यासाठी जाण्याचा प्रयत्न करा, असे प्रतिपादन गुजरातचे लोकप्रिय आमदार व युवा नेते जिग्नेश मेवाणी यांनी केले.

नागपूर : कुंभमेळ्यात जाण्यापेक्षा हॉवर्ड आणि ऑक्‍सफोर्ड यासारख्या विदेशी विद्यापीठांत शिकण्यासाठी जाण्याचा प्रयत्न करा, असे प्रतिपादन गुजरातचे लोकप्रिय आमदार व युवा नेते जिग्नेश मेवाणी यांनी केले.
उत्तर नागपुरातील अशोकनगर येथील डॉ. राममनोहर लोहिया वाचनालय परिसरात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. या वेळी माजी राज्यमंत्री व कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. नितीन राऊत, कुणाल राऊत, सुबोध चहांदे उपस्थित होते. जिग्नेश मेवाणी म्हणाले, ""शेतकरी आणि गरीब कामगारांच्या हक्कासाठी शेवटपर्यंत लढावे. कोणत्याही परिस्थितीत अन्याय अत्याचार सहन करू नका. संघर्ष करून प्रतिरोध करा. बाबासाहेबांनी दिलेला मंत्र- शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आत्मसात करून महापुरुषांनी दाखवलेल्या मार्गावर चाला.'' या वेळी जिग्नेश यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Go to university for study : jignesh Mevani